भागशाळा मैदानासाठी आणखी एक बोअरवेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भागशाळा मैदानासाठी आणखी एक बोअरवेल
भागशाळा मैदानासाठी आणखी एक बोअरवेल

भागशाळा मैदानासाठी आणखी एक बोअरवेल

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १२ : डोंबिवली पश्चिमेच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भागशाळा मैदानाची दुरवस्था होऊ नये, खेळासाठी व मोकळा श्वास घेण्यासाठी मैदाने वाचली पाहिजेत म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला. ज्येष्ठांच्या या पुढाकाराला समाजसेवक प्रल्हाद म्हात्रे यांची साथ मिळाली आहे. प्रल्हाद म्हात्रे यांच्या मदतीमुळे भागशाळा मैदानात आता आणखी एक बोअरवेल उपलब्ध झाली आहे.
डोंबिवलीतील भागशाळा मैदानात ज्येष्ठ नागरिक मंचाने बोअरवेल मारण्यासाठी पुढाकार घेतला. मंचाचे महेंद्र मोकाशी, विलास पुरुषोत्तम ढोंगसाळे, गोरख शेंजवळ, विजय कुलकर्णी व हिराजी परमार यांनी यासाठी केडीएमसीकडे पाठपुरावा करून भागशाळा मैदानात बोअरवेल मारण्याची परवानगी मिळवली. वर्षभरापूर्वी दुरवस्था झालेल्या भागशाळा मैदानाचा कायापालट मनसेचे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी स्वखर्चाने केला. आता उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे मैदानातील माती तापली व जोरदार हवा सुटल्यानंतर धूळ उडते. या धुळीच्या त्रासातून सर्वांची मुक्तता करायची असेल, तर पाणी मारण्यासाठी आणखी एका बोअरवेलची आवश्यकता होती. ही बोअरवेल मारण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च झाला. ज्येष्ठांच्या या प्रयत्नांना प्रल्हाद म्हात्रे यांनी साथ देत स्वखर्चाने बोअरवेल मारून दिली आहे. त्यामुळे भागशाळा मैदानातील धुळीचा त्रास आता थांबणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top