जेएनपीटीतील स्‍फोटप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेएनपीटीतील स्‍फोटप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल
जेएनपीटीतील स्‍फोटप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

जेएनपीटीतील स्‍फोटप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : जेएनपीटीच्या शॉलो वॉटर बर्थजवळ असलेल्या ड्रेझिंग बार्जमध्ये पेंटिंगचे काम सुरू असताना ज्वलनशील थीनरला आग लागल्‍याने स्‍फोट झाला. या स्फोटात एक कामगार जागीच ठार तर इतर दोन कामगार गंभीररीत्या भाजल्‍याने जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी पेंटिंगचे काम घेणाऱ्या संबंधित कंत्राटदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
जेएनपीएच्या शॉलो वॉटर बर्थजवळ गेल्‍या पाच - सहा महिन्यांपासून रो-रो सर्व्हिस जेटीचे काम सुरू आहे. यासाठी समुद्रात खोली वाढविण्यासाठी ड्रेझिंगचे काम करण्यात येत आहे. हे काम परेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या खासगी कंपनीकडून केले जात आहे. कंपनीकडून ड्रेझिंग बार्जच्या दुरुस्तीचे काम सुरू असून सोमवारी बार्जमध्ये पेंटिंगचे काम करण्यासाठी सहा कामगार उतरले होते. सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास रंगात मिसळण्यासाठी ठेवलेल्‍या ज्वलनशील थीनरचा आगीशी संपर्क आल्याने त्याने पेट घेतला. पेंटिंगच्या कामामुळे बार्जमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस निर्माण झाल्‍याने ज्वलनशील थीनरच्या डबे आणि गॅसने पेट घेतल्‍याने भीषण स्फोट झाला. स्फोटात अब्दुल सलाम (२१) हा कामगार गंभीररीत्या भाजून जागीच ठार झाला तर हिरालाल प्रजापती (२५) हा कामगार ९० टक्के भाजल्याने त्याला जेएनपीटी ट्रॉमा सेंटरमधून ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अनुज राजवीर सिंह (२३) या कामगाराला जेएनपीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटनेनंतर न्हावा शेवा पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासात बार्जमध्ये रंगकाम करताना संबंधित कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची काळजी न घेतल्याचे तसेच त्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याचे आढळले. त्यामुळे न्हावा शेवा पोलिसांनी संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात निष्काळजीचा गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top