
दहा हजारांची लाच घेताना अटक
भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) : सात-बारावर अधिकार अभिलेखात नाव दाखल करण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या खडवली वर्ग ३ चे मंडळ अधिकारी राजेंद्र बाबुराव बोऱ्हाडे (वय ५३) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. तसेच नीलेश बाळाराम चौधरी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडवलीतील गेरसे हद्दीत तक्रारदाराने जमीन खरेदी केली आहे. या जमिनीवर अधिकार अभिलेखात सात-बारावर नाव नोंदविण्यासाठी खडवली वर्ग ३ चे मंडळ अधिकारी राजेंद्र बाबुराव बोऱ्हाडे (वय ५३) यांनी तक्रारदाराच्या ओळखीच्या व्यक्तीकडे ५० हजारांची मागणी केली होती. तसेच त्यांच्यासोबत काम करणारा खासगी व्यक्ती नीलेश चौधरी यानेही त्यांना सहकार्य केले होते. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी राजेंद्र बोऱ्हाडे याला अटक केली. तसेच नीलेश चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..