निवृत्त अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

निवृत्त अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

घाटकोपर (बातमीदार) ः पंतनगर पोलिस ठाण्यातील एका सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकावर मंगळवारी (ता. १२) रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या माजी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. अद्याप त्याला अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील दोघी पीडिता या घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहतात. पाटील यांनी एका प्रकरणात मदत करण्याचे प्रलोभन दाखवून गेल्या वर्षी २१ एप्रिल ते जून २०२१ या काळात त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. पाटील हे पंतनगर पोलिस ठाण्यात २०१९ ते जून २०२१ या कालावधीत नेमणुकीस होता. त्या दरम्यान फिर्यादींना त्यांच्या तक्रार अर्जात मदत केल्याची जाणीव करून देत होता. तसेच व्हॉट्सॲपवर मेसेज करून बदनामी करण्याची धमकी देत होता, असा आरोप पीडितांनी केला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय घोसाळकर अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com