बिमल कोठारी यांची अध्यक्षपदी नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिमल कोठारी यांची अध्यक्षपदी नियुक्ती
बिमल कोठारी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

बिमल कोठारी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन या भारतातील डाळी व्यापार आणि उद्योगाच्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी बिमल कोठारी यांची नियुक्ती झाली आहे. विद्यमान अध्यक्ष जितू भेडा यांची सन २०१८ मध्ये आयपीजीएचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बिमल कोठारी यांनी प्रवीण डोंगरे आणि जितू भेडा यांच्यानंतर असोसिएशनचे तिसरे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला. कोठारी हे असोसिएशनच्या प्रमुख संस्थापक सदस्यांपैकी असून २०११ पासून म्हणजे संघटनेच्या स्थापनेपासून ते आयपीजीएचे उपाध्यक्ष होते.