विक्रोळीत घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रोळीत घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास
विक्रोळीत घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास

विक्रोळीत घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः विक्रोळी पूर्वेतील कन्नमवारनगर दोन येथील इमारत क्रमांक ६२ मधील तळमजल्यावरील एका घरात भर दुपारी दोनच्या सुमारास घरफोडी करत चोराने दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी (ता. २०) घडली. यात २० तोळे सोने, दोन मोबाईल आणि पाच हजार रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.
याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केली असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. विक्रोळी कन्नमवार येथील विमल कटारे हे दुपारी कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरी केली. कटारे काम संपवून घरी परतले असता त्यांना कुलूप तोडल्याचे निदर्शनात आले. याबाबत त्यांनी विक्रोळी पोलिसांत तक्रार दाखल केली. विक्रोळी पोलिस या घटनेबाबत अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top