
गटाराच्या खोदकामामुळे जीव धोक्यात
मालाड, ता. २४ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील भुजाले तलावालगत मुंबई महापालिकेच्या वतीने गटार रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या खोदकामामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनांना धोका निर्माण झाला आहे. गटाराच्या कामासाठी जवळपास आठ फूट खोल आणि ६ फूट रुंद आणि १०० फूट लांब खोदकाम केले आहे. मात्र संरक्षणासाठी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे खड्ड्यात पादचारी, तसेच वाहने पडून दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
लिंक रोडवरून सोमवार बाजार, तसेच स्वामी विवेकानंद रोडला ये-जा करणारी शेकडो वाहने दिवसभर येथून जात असतात. तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असल्याने एखादे वाहन अथवा पादचारी या खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते. स्थानिक रहिवासी संतोष चिकणे यांनी याबाबत पालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. या खड्ड्यात कोणी चुकून जरी पडला तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
...
या कामाबाबत माहिती घेतो आणि उपाययोजना करायला सांगतो.
- भाग्यवंत लाटे, उपअभियंता, घनकचरा व्यवस्थापन, पालिका.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..