किशोर रांगणेकर यांची विश्वस्तपदी नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किशोर रांगणेकर यांची विश्वस्तपदी नियुक्ती
किशोर रांगणेकर यांची विश्वस्तपदी नियुक्ती

किशोर रांगणेकर यांची विश्वस्तपदी नियुक्ती

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः सारस्वत ब्राह्मण समाज गिरगाव संस्थापित गावदेवीच्या मोतीबेन दळवी रुग्णालयावर किशोर रांगणेकर यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आहे. आधुनिक आरोग्यसोयी असलेल्या या रुग्णालयात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात रुग्णसेवा दिली जाते. रांगणेकर हे सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक असून ते गेली पन्नास वर्षे विद्यादान क्षेत्रात कार्यरत आहेत. चिकित्सक समूहाच्या शिरोळकर हायस्कूलचे व पाटकर कॉलेजचे ते अध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळच्या संमेलन निधीचे कार्यकारी विश्वस्त आहेत, अशी माहिती सारस्वत ब्राह्मण समाजाचे सचिव राजन देसाई यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top