नव्या जगाची आव्हाने युवाच स्वीकारू शकतात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या जगाची आव्हाने युवाच स्वीकारू शकतात!
नव्या जगाची आव्हाने युवाच स्वीकारू शकतात!

नव्या जगाची आव्हाने युवाच स्वीकारू शकतात!

sakal_logo
By

धारावी, ता. २४ (बातमीदार) : नवतंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे जगभरातला मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा प्रसंगी कला, साहित्य, उद्योगात जे काही द्यायचे आहे, ते जागतिक पातळीवर द्यावे लागणार असून हे आव्हान केवळ युवाच स्वीकारू शकतात, अशा शब्दांत एमकेसीएलचे ज्येष्ठ माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ विवेक सावंत यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१’ चे त्यांच्या हस्ते शनिवारी (ता. २३) वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, लेखिका व कवयित्री प्रज्ञा दया पवार, दीपाली चांडक, मुमताज शेख, मनोज हाडवळे, अजित भुरे, संजय घारपुरे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी बोलताना विवेक सावंत यांनी नवमहाराष्ट्र हा जगाला काय देऊ शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे; तो विचार केवळ युवाच करू शकतात. कारण आव्हान स्वीकारण्याची आणि त्यावर उत्तर शोधण्याची ऊर्मी त्यांच्याकडेच असते, प्रौढांकडे नाही, असे प्रतिपादन केले. चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा रंगला. सर्व पुरस्कारांचे स्वरूप एकवीस हजारांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पुरस्कारार्थी युवांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
...
पुरस्कार विजेते...
राही सरनोबत, स्वरूप उन्हाळकर, अविनाश साबळे, छाया भोसले, रवी चौधरी, अक्षय शिंपी, (मुंबई), शुभम अवधूत, यशवंत वैष्णव, ऐश्वर्या रेवाडकर, ज्ञानेश्वर जाधवर, मीनाक्षी वाळके, अश्विन पावडे, सोनाली गराडे आदींना सन्मानित करण्यात आले.
...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top