तळोजा कारागृहासमोर शिवसैनिकांची गर्दी

तळोजा कारागृहासमोर शिवसैनिकांची गर्दी

Published on

खारघर, ता. २४ (बातमीदार) : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने याप्रकरणी त्‍यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात आमदार राणा याना तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात आणणार असल्याची माहिती मिळताच खारघरमधील युवा सेनेचे अवचित राऊत, दत्ता दळवी, सचिन पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी तळोजा कारागृहासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या वेळी उपस्थित कार्यकर्ते शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत राणा दाम्पत्याचा निषेध करीत होते.
युवा सेनेचे पदाधिकारी अवचित राऊत या वेळी बोलताना म्हणाले, रवी राणा याना कारागृहात घेऊन येणार असल्यामुळे स्वागतासाठी आलो असून हार घालून त्यांचे स्वागत करणार आहोत. राज्यात आघाडी सरकार चांगल्या प्रकारे काम करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहे. असे असताना राणा दाम्पत्य हे मातोश्रीच्या समोर हनुमान चालिसा पठणाच्या नावाखाली समाजात दुही पसरविण्याचे काम करीत आहे. न्यायालयाने चांगला निर्णय दिल्याने शिवसैनिक समाधानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com