डी. एम स्पोर्ट्स फाऊंडेशनची बाजी

डी. एम स्पोर्ट्स फाऊंडेशनची बाजी

Published on

वसई, ता. २४ (बातमीदार) : माकूणसार स्पोर्ट्स फाऊंडेशन व पालघर जिल्हा ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सफाळे येथे ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डी. एम स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडुंनी २० सुवर्ण, ५ रजत व ७ कांस्यपदक जिंकून स्पर्धेत बाजी मारली.

ॲथलेटिक्स स्पर्धेत जिल्ह्यातून १४ ते २० वर्षांवरील वयोगटासाठी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत डी. एम स्पोर्ट्‌स फाऊंडेशनने एकूण ३२ पदके जिंकली. पहिल्याच वर्षी स्पर्धेत भाग घेत उपविजेता पदाच्या सन्मानचिन्हावर डी. एम. स्पोर्ट्सने आपले नाव कोरले आहे. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभप्रसंगी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पालघर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव राकेश सावे, खेळाडू अमन चौधरी, बाबा गुंजाळ उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक दुर्गेश महाले यांच्यासह प्रशिक्षक अमित सिंग, महेश जाधव, योगेश घरत, बळीराम शेटे, अशोक मुंडक व प्रदीप कदम यांनी खेळाडूंचा सराव घेण्यासाठी विशेष मेहनत केली. यापुढे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com