
ओबीसी संघर्ष मोर्चासाठी गावोगावी प्रचार
पालघर, ता. २५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात ओबीसी आरक्षण शून्य टक्के दाखवल्याने या अन्यायाविरोधात पालघर जिल्हा ओबीसी संघर्षाने आवाज उठवला आहे. या अन्यायाविरोधात ओबीसी संघर्षतर्फे २९ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी व मोर्चामध्ये अधिकाधिक जण उपस्थित राहावे यासाठी मोरे भंडारी समाजातर्फे भंडारी समाजाचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर, माजी अध्यक्ष सुभाष मोरे व अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध गावात भेटी दिल्या. यात घिवली, दिलेवाडी, सालवड, ऊनभाट, वेंगणी व पोफरण या गावांचा समावेश आहे. ओबीसी संघर्षच्या मोर्चाला समाजातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. तसेच आरक्षण न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीची माहिती देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..