गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री
गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री

गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची औषधे ऑनलाईन ॲपवरून घरपोच विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच ऑनलाईन औषधे मागविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिशो या ऑनलाईन शॉपिंग अॅपवर गर्भपाताची औषधे सर्रासपणे विक्री होत असल्याची तक्रार सुहास गाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्र्यांकडे दाखल केली होती. त्यानुसार औषध निरीक्षक सुनील गवळी यांनी आपल्या फोनवरून मिशो ॲपद्वारे गर्भपाताच्या औषधांची आर्डर दिली होती. त्यानंतर त्यांच्या घरी गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची डिलीव्हरी देण्यात आली. सदर औषधांची डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने त्याचे बिल सुद्धा गवळी यांना दिले. सदर औषधांच्या बिलावर दक्षिण दिल्लीतील न्यू लायन्स हॉस्पिटलचा उल्लेख आहे. या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करण्यात येऊ नये, तसेच सदर औषधांचा वापर हा स्त्री-रोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व त्यांच्या शिफारसीने करण्यात येणे आवश्‍यक आहे. त्यामुळे गवळी यांनी औषधांची बेकायदा ऑनलाईन विक्री करणाऱ्या एस. एस. ट्रेडर्स, मिशो ऑनलाईन पोर्टल चालवणारी संस्था, तसेच संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top