मेट्रो निर्मीती प्रकल्प

मेट्रो निर्मीती प्रकल्प

फोटो ः
-----
‘मेट्रो ट्रेन’ सुविधांची संभाजीनगरात निर्मिती
‘सिमेन्स’ करणार १८६ कोटी रुपयांची गुंतवणूक
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १४ ः जागतिकस्तरावर वाढत्या मेट्रो रेल्वे नेटवर्कची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने ‘सिमेन्स’ने छत्रपती संभाजीनगरात अत्याधुनिक मेट्रो ट्रेन सुविधा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल १८६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सिमेन्स लिमिटेडने भारतात आपल्या ३२ कारखान्यांपैकी दोन कारखान्यांच्या विस्ताराची घोषणा केली. यामुळे कंपनीची एकूण कॅपेक्स गुंतवणूक तब्बल एक हजार कोटींपेक्षाही जास्त वाढण्याची शक्यता आहे.
ही सुविधा अद्ययावत तंत्रज्ञान, स्थानिक पातळीवर खरेदी केलेले घटक आणि कुशल तांत्रिक मनुष्यबळाने सुसज्ज असेल आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेऊ शकेल. भविष्यात मेट्रो प्रकल्पांसाठी निर्यात केंद्र म्हणून ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
‘सिमेन्स’चे दोन्ही कारखाने जागतिकस्तरावर बेंचमार्क केलेल्या सस्टेनेबिलिटी कारखान्यांमध्ये स्थान मिळवतील, असा विश्वास सिमेन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथूर यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यात कारखाना
सिमेन्स उद्योग, पायाभूत सुविधा आणि वीजवितरण क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांची झपाट्याने वाढणारी गरज भागविण्यासाठी गोवा येथे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर हा कारखाना विस्तारत आहे. त्यामध्ये ३३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, ही गोव्यातील सिमेन्सची ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com