Mon, Feb 6, 2023

अंबा नदीपात्राची साफसफाई
अंबा नदीपात्राची साफसफाई
Published on : 15 January 2023, 10:21 am
पाली, ता. १५ (वार्ताहर) ः अंबा नदीतून पालीकारांना पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी येथील जॅकवेलजवळ अंबा नदी पात्रालगत कचरा जमा झाल्याने परिसर अस्वच्छ झाला होता. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर पाली नगरपंचायतीमार्फत जॅकवेल जवळील अंबा नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली
नगराध्यक्षा प्रणाली शेळके, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा सभापती सुलतान बेनसेकर यांच्या देखरेखीखाली ही साफसफाई करण्यात आली. अंबा नदीपात्रातील प्लास्टिक पिशव्या व बॉटल, निर्माल्य, पालापाचोळा, कचरा काढण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पाली ः अंबा नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.