राज्यपालांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींचा सन्मान

राज्यपालांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींचा सन्मान

Published on

अलिबाग, ता. ८ : जनशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्ये चौल येथील प्रशिक्षणार्थींनी यश संपादन केले. या प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षिका रेखा घरत यांचा ''पंखांना बळ कौशल्याचे'' अंतर्गत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनमध्ये सन्मान करण्यात आला. या वेळी पालकसंस्था जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमय्या, निर्देशक विजय कोकणे; तसेच इतर जनशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते प्रशिक्षिका रेखा घरत, प्रशिक्षणार्थी रूपाली मढवी, रीना भोईर, उत्तरा म्हात्रे, स्नेहा नाईक, मनवा तवसाळकर, तेजस्वीनी मांढरे आदींचा सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.