Thur, March 23, 2023

कोळघर आश्रमशाळेत आरोग्य शिबिर
कोळघर आश्रमशाळेत आरोग्य शिबिर
Published on : 20 February 2023, 11:20 am
अलिबाग, ता. २० : पोयनाड विभाग मेडिकल प्रॅक्टिशनर वेल्फेअर असोसिएशन (मॅप) संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील कोळघर येथील शासकीय आश्रमशाळेत दोन दिवसीय आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून आश्रम शाळेतील ४५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
आरोग्य तपासणीबरोबर ‘मुलगी वयात येताना’ या विषयावर डॉ.भक्ती ओंकार पाटील यांचे व ‘नशा व त्याचे दुष्परिणाम’ या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अर्चना सिंग यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. डॉ. सुनीता मकरंद पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.