जिल्ह्यात शेकापला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात शेकापला धक्का
जिल्ह्यात शेकापला धक्का

जिल्ह्यात शेकापला धक्का

sakal_logo
By

पाली, ता. १ (वार्ताहर) ः पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघातील शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील पाचशेपेक्षा अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पेणचे भाजपचे आमदार रवी पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश केला आहे.
शेकापक्षाची मुलुख मैदानी तोफ म्हणून धैर्यशील पाटील यांची ओळख होती. धैर्यशील यांच्या भाजप प्रवेशाने पेण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. भाजपचे रायगडमधील लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून धैर्यशील पाटील यांच्याकडे बघितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगेस पक्षासमोर आवाहन उभे राहिले आहे.

पाली ः धैर्यशील पाटील यांचे पक्षात स्वागत करताना देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे