जिल्हा रुग्णालयात होमिओपॅथिक दिन साजरा

जिल्हा रुग्णालयात होमिओपॅथिक दिन साजरा

अलिबाग : होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हनेमान यांचा १० एप्रिल १७५५ जन्म झाला. हा दिवस जागतिक पातळीवर होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आपले आरोग्य होमिओपॅथिक उपचार पद्धतीने चांगले राहो, यासाठी जिल्हा रुग्णालयातही हा दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालयात जागतिक होमिओपॅथिक दिवस डॉ. सॅम्युअल हनेमान यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अलिबाग येथील ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉ. अरविंद केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळेस जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास माने व डॉ. देशमुख आयुष विभागप्रमुख व डॉ. रश्मी गंभीर व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com