उच्च शिक्षणासाठी नामी संधी

उच्च शिक्षणासाठी नामी संधी

पाली, ता. १० (वार्ताहर) : स्वदेस फाऊंडेशनमार्फत दरवर्षी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदाही ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी पात्रताधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या शिक्षण विभागप्रमुख नीता हरमलकर यांनी केले आहे.
रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाऊंडेशन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यांमध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यांमधून सुरू आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्च शिक्षणासाठी बारावी पास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी पात्रताधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी स्वदेस शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आपले अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवलेली आहे. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थी रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यांतील रहिवासी असावा. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८.५ लाखांच्या आत असावे. बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक बाळासाहेब माने ९९२२४९५०३३ आणि विनोद पाटील ८३७९९६६७६७ यांना संपर्क करण्याचे आवाहन नीता हरमलकर यांनी केले आहे.

क्यूआर कोडद्वारे अर्जप्रक्रिया
विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. यासाठी स्वदेस फाउंडेशनने क्यूआर कोड जारी केले आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपली माहिती भरून १५ एप्रिलपूर्वी ती पाठवायची आहे. त्यानंतर फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्याच्या दोन मुलाखती घेतल्या जातील. मुलाखतीत पास झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल.

शिष्यवृत्तीचे स्वरूप
शिष्यवृत्ती विद्यार्थ्याचे उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाईल. प्रत्येक वर्षी दोन हप्त्यांमध्ये ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला दिली जाईल. शिष्यवृत्ती रक्कम ही विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थ्याच्या वार्षिक उत्पन्नानुसार, त्याच्या कॉलेज फी आणि वसतिगृह खर्चाच्या २५, ४०, ५०, ६०, ७५ टक्के रक्कम दिली जाईल.

उच्चशिक्षण अभ्यासक्रम
वैद्यकीय क्षेत्र - बीएएमएस, एमबीबीएस, बीडीएस, नर्सिंग, फार्मसी
वाणिज्य क्षेत्र - सीए, सीएस, बीकॉम इन अकाउंटन्सी
अभियांत्रिकी क्षेत्र - पदवी, पदविका व आर्किटेक्चर
कायदा क्षेत्र - एलएलबी
हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर,
स्पर्धात्मक परीक्षा, यूपीएससी, सैन्यदल व पोलिस पात्रता परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com