जिल्‍हास्‍तरीय कामगार चषक कबड्डी स्‍पर्धा

जिल्‍हास्‍तरीय कामगार चषक कबड्डी स्‍पर्धा

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : कामगार दिनाचे औचित्यसाधून कुरूळ येथील आरसीएफ क्रीडासंकुलात आयोजित जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील ६४ संघांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्याच्या उद्देशाने आरसीएफतर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष या स्पर्धेचे आयोजन करता आले नव्हते. त्‍यामुळे यंदा घेतलेल्‍या स्‍पर्धेत रायगड जिल्हा आदिवासी संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे उद्‌घाटन आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी कार्यकारी संचालक सुनील ठोकळ, महाव्यवस्थापक शशिकांत उखळकर, नितीन हिरडे, संजीव हरलीकर यांसह सर्व संघटना पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. वाढत्या उष्णतेचा खेळाडूंना त्रास होऊ नये, याची खबरदारी म्हणून यंदा आच्छादित क्रीडांगणात स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या संघास कामगार चषक आणि २५ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघास रोख रुपये १५ हजार आणि ट्रॉफी देण्यात येईल. या शिवाय तिसरा व चौथ्या क्रमांक मिळवणाऱ्या संघास बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक पारितोषिके देखील दिली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com