माणगाव खुर्द वाडी दरडीच्या छायेत

माणगाव खुर्द वाडी दरडीच्या छायेत

पाली, ता. ६ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील डोंगरालगत वसलेल्‍या माणगाव खुर्द आदिवासीवाडीवर दरडीचे संकट ओढावण्याची शक्‍यता आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ तिडके यांनी नुकतेच तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन दिले. दरडीचा धोका असलेल्‍या भागाची पाहणी आणि उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधागड तहसील कार्यालयाकडे २०२१ मध्ये पत्रव्यवहारही केला होता. या बाबतचे पत्र माणगाव बुद्रुक ग्रामपंचायतलाही दिले होते. मात्र त्‍यानंतर काय उपाययोजना केल्‍या, कोणती कार्यवाही केली अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेतली नसल्‍यास दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी तिडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सुधागड पंचायत समितीचे पत्र
पाली-सुधागड पंचायत समितीतर्फे माणगाव बुद्रुक सरपंच व ग्रामसेवक यांना २९ मे रोजी या संदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती कार्यालयाकडे तात्काळ सादर करावा, त्‍यात दिरंगाई झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे सांगण्यात आले आहे.

फोटो ओळ, पाली, तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ तिडके. (छायाचित्र, अमित गवळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com