जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत पालकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
शिक्षण विभागाचे निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत ठरवले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत शिक्षण विभाग बांधिल नसेल, यासाठी सावधानता म्हणून अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल-ओवे, तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर, केळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल-तळोजा पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल-तळोजा, वेदिक ट्री प्री स्कूल-करंजाडे, वेद ड्राप पब्लिक स्कूल- करंजाडे, डॉल्फिन किड्स स्कूल-करंजाडे, ओसीन ब्राईट कॉन्हेंट स्कूल-तळोजा, वेदांत पब्लिक स्कूल-कळंबोली, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल-कळंबोली, सेंट अन्योनी इंग्लिश स्कूल- करंजाडे, एस.जी.टी. इंटरनॅशनल स्कूल-करंजाडे, वेद गृह इंटरनॅशनल स्कूल-करंजाडे, ओझन्स इंटरनॅशनल स्कूल-कोळखे, प्लिजन्ट इंग्लिश स्कूल-सांगडे, एस. बी. पी. इंग्लिश स्कूल-शेडुंग, पायोनियर पब्लिक स्कूल-पारगाव, लिटल चॅम्प-ओवळे, एकलव्य स्कूल- ओवळे, साई गणेश एज्युकेशन सोसायटीची लाटे विनायक केशव जोशी मेमोरियल नवजीवन इंटरनॅशनल स्कूल-आपटा फाटा, दि इंग्लिश स्कूल-उलवा, न्यू इंग्लिश स्कूल-कोपरा, रोहिंजण इंग्लिश स्कूल-रोहिंजण, आकृती एज्युकेशनल अँड वेलफेअर सो. एस.एम.बी. इंटरनॅशनल स्कूल-उलवे या शाळा सरकारच्या परवानगीविना सुरू आहे. पालकांनी या शाळांमध्ये आपल्या पाल्यास दाखल करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com