कस्तुरीच्या सुरेल स्वरांनी आनंदयात्री मंत्रमुग्ध

कस्तुरीच्या सुरेल स्वरांनी आनंदयात्री मंत्रमुग्ध

Published on

अलिबाग, ता. ११ : तालुक्यातील नागाव येथे आनंदयात्रीतर्फे उदयोन्मुख शास्त्रीय गायिका कस्तुरी देशपांडे हिच्या गायनाचा कार्यक्रम रविवार (ता. ९) पार पडला. पंडित अरुण कशाळकर यांची शिष्या असलेल्या कस्तुरीने राग नंदने मैफलीचा प्रारंभ केला. नंद रागाच्या अभ्यासपूर्ण आणि रंजक मांडणीने रसिक त्या रागात तल्लीन झाले. नंदमधली ‘धन धन’ ही बंदिश रसिक श्रोत्यांना खूपच आनंद देऊन गेली. राग नंदनंतर राग रागेश्रीमधील ‘मोरा मन’ ही बंदिश आणि त्याला जोडून एक सुरेल तराना उत्तमरीत्या सादर करून कस्तुरीने रसिकांची मने जिंकली. रागेश्री राग सादर केल्यानंतर ‘याद पिया की’ ही सुप्रसिद्ध ठुमरी सादर केली. उत्तम स्वर, रागाची उत्तम मांडणी यामुळे रंगलेल्या मैफलीची सांगता कस्तुरीने भैरवी गाऊन केली. निनाद जोशी यांनी हार्मोनिअमवर तर आदित्य पानवलकर याने तबल्यावर अतिशय समर्पक साथ संगत केली. स्वरसाथ चैत्राली देसाई हिने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.