वाडगाव ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन

वाडगाव ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन

Published on

अलिबाग, ता. १८ : तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. सोमवारी वाडगावच्या सरपंच सरिता जयेंद्र भगत यांना मानांकन संस्थेच लिड ऑडिटर किरण भगत यांनी मानांकन प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी अलिबाग पंचायत समिती विस्तार अधिकारी डी.बी. राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपसरपंच नीलम थळे, सदस्य प्रसाद पाटील, सदस्य जयेंद्र भगत, सदस्या प्रमिला कुले, सदस्या शुभांगी भगत, सदस्या अंजली भगत, सदस्य सजना नाईक, ग्रामविकास अधिकारी बाबूराव वणवे यांच्यासह माजी उपसरपंच नरेश थळे, माजी सरपंच मनिषा भगत, पोलिस पाटील नथुराम म्हात्रे आदी उपस्थित होते. कार्यालयाची कामकाज पद्धत, स्वच्छता, नेटनेटकी इमारत, ग्रामस्थांना मिळणारी वागणूक आदी निकषानुसार आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.