गोकुळवाडातील विद्यार्थी गिरवणार संगणकावर ज्ञानकण

गोकुळवाडातील विद्यार्थी गिरवणार संगणकावर ज्ञानकण

पाली, ता. ३१ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा प्राथमिक शाळेला सारथी फाऊंडेशन मुंबईच्या वतीने नुकतेच संगणक, ताडपत्री, शैक्षणिक साहित्याची भेट देणार आली. यामुळे येथील विद्यार्थी संगणकाद्वारे शिक्षण घेणार आहेत.
सध्याचे युग हे संगणक, विज्ञान, स्पर्धेचे आहे. अशा युगात गोकुळवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाद्वारे नवनवीन ज्ञान, माहिती सहजपणे मिळावी. तंत्रज्ञानाचा वापर करता यावा. जगाशी स्पर्धा करता यावी, यासाठी शाळेला डिजिटल करण्याचा मानस ठेवून संगणक भेट दिले, असे सारथी संस्थेचे अध्यक्ष अशोक जंगले यांनी सांगितले. शाळेचे बांधकाम होऊन दहा वर्षे झाल्याने स्लॅब गळत आहे. या गळणाऱ्या छतावर टाकण्यासाठी मीनाक्षी गोपीनाथ पाटील यांच्याकडून फाऊंडेशनने ताडपत्री मिळवून दिली. या वेळी तुकाराम पाटणकर, ज्योत्स्ना पाटणकर, रश्मी शाह यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन ,पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर इत्यादी साहित्याचे वाटप केले. तसेच चॉकलेट, बिस्कीट, फ्रुटी असा गोड खाऊ दिला. कार्यक्रमास सदस्य महेश चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मुख्याध्यापक सतीश हुले, चंद्रकांत ढेबे, धाऊ कोकरे, रमेश खरात, राम ढेबे, यशवंत झोरे, हेमंत झोरे, सुरेश खरात, भावेश झोरे, सविता ढेबे, कोंडी खरात उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com