वृक्षसंवर्धनाचा प्रयोग गावागावांत व्हावा

वृक्षसंवर्धनाचा प्रयोग गावागावांत व्हावा

वृक्षसंवर्धनाचा प्रयोग गावागावांत व्हावा


सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. २१ : पेण तालुक्यातील हमरापूर येथील अक्षर विद्यालयात झाडे लावण्याचे, जगवण्याचे शिक्षण दिले जात असून जगवलेल्या झाडांचे वाढदिवसही साजरे केले जातात. पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचे शिक्षण निसर्गरम्य शाळेत मिळत असल्‍याने विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. वृक्षसंवर्धनाचा हा दिशादर्शक प्रयोग प्रत्येक गावागावांत राबवायला हवा, असे प्रतिपादन रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
हमरापूर येथील अक्षर विद्यालयात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा अभिनव कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून सोमनाथ घार्गे यांच्यासह अपअधीक्षक शिवाजी फडतरे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते. काही ठिकाणी त्याच त्‍याच खड्ड्यात दरवर्षी नवीन झाडे लावली जातात, फक्त पाहुणा बदलतो, म्हणून जे झाड लावाल, त्‍याचे संवर्धनही झाले पाहिजे, असे मार्गदर्शन घार्गे यांनी केले.
कार्यक्रमाला सरपंच राकेश दाबाडे, माजी सरपंच प्रदीप म्हात्रे, पोलिस अधिकारी अजित गोळे, प्रभाकर नाईक आदी उपस्थित होते. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी सत्‍कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खरजे यांनी केले. तर नियोजन मुख्याध्यापक अरुण डोंगरदिवे, शिक्षक रामचंद्र पाटील, सुनील म्हात्रे, गणेश डंगर यांनी केले.

अंकुश शिंदेंनी लावलेले झाड बहरले
अक्षर विद्यालयात २०१२ मध्ये तत्‍कालीन पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी एक झाड लावले होते. त्‍या बहरलेल्‍या झाडाचा फोटो काढून पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी शिंदे यांना पाठवला.

अलिबाग ः पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे वृक्षारोपण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com