Accident: काशीद खिंडीतील अपघातात एक ठार; जाणून घ्या नक्की काय झालं?

accident news
accident newsesakal
Published on

Accident: अलिबाग-मुरूड मार्गावरील काशीद खिंडीत झालेल्या कार अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.


मुंबई येथून मंदार नरेश मोटकर, साईनाथ कोडीवाला, हेमंत मिश्रा, सुनील गायकर हे मुंबई येथे ओला टॅक्सी चालक मित्र असून हे कार घेऊन फिरण्यासाठी मंगळवार (ता. २३) मुरूडला आले होते. दुपारी एक वाजता काशीद खिंडीतील बापूजी देवस्थान ते यू टर्नदरम्यान असणाऱ्या उतारावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

अपघातात मंदार नरेश मोटकर (रा. -मुंबई, मूळ रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला तर साईनाथ कोडीवाला, हेमंत मिश्रा, सुनील गायकर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com