जिल्हा रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर उत्‍साहात

जिल्हा रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर उत्‍साहात

जिल्हा रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर उत्‍साहात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : रायगड मेडिकल असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीने नुकताच पदभार हाती घेतला आहे. त्यानुसार मे मध्ये पहिल्‍याच आठवड्यात प्‍लास्‍टिक सर्जरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्‍यादृष्टीने रविवारी स्क्रिनिंग शिबिर घेण्यात आले. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या या कॅम्पमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साधारणतः पन्नास रुग्णांवर तज्‍ज्ञ व अनुभवी प्लास्टिक सर्जन्समार्फत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले यांनी सांगितले.
ज्‍येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल, डॉ. स्वप्ना आठवले व त्यांचे सहकारी, सिव्हिल सर्जन व अलिबाग येथील सर्जन्स, भूलतज्‍ज्ञ, भिषक, बालरोगतज्‍ज्ञ तसेच रायगड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने होणाऱ्या या कॅम्पमध्ये भाजल्यानंतरचे व्रण, अतिरिक्त बोट, जन्मतःच असणारी ओठातील भेग, जिभेखाली असणाऱ्या नसांच्या अडचणी, मसा यांसारख्या विविध विकारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, असे असोसिएशनचे कार्यवाह डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी सांगितले. आरोग्याविषयी कोणत्याही मोठ्या कॅम्पमध्ये आयत्या वेळेस काही समस्या, अडचणी निर्माण होऊ नये, म्हणून रुग्णांची फिटनेस छाननी होणे गरजेचे असते आणि त्या धर्तीवर हा कॅम्प होता, असे मत उपक्रमाचे प्रमुख डॉ. नितीन मोकल यांनी मांडले. यावेळी डॉ. अद्वैत कुलकर्णी, डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. सचिन जायभाये, डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. अपूर्वा कुलकर्णी, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. संदेश, डॉ. रश्मी भगत तसेच सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर व रुग्णालयातील परिचारिका यांच्या सहकार्याने स्क्रिनिंगसाठी बोलावलेल्या नव्वदपैकी पन्नास रुग्णांवर ३, ४ व ५ मे या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यासाठी फिटनेस दिले गेले. या स्क्रिनिंग शिबिरात असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, कार्यवाह डॉ. राजेंद्र चांदोरकर व डॉ. नवलकिशोर साबू हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com