तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये क्रीडा रणसंग्रामचे आयोजन

तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये क्रीडा रणसंग्रामचे आयोजन

तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये क्रीडा रणसंग्रामचे आयोजन
अलिबाग, ता. २९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात वार्षिक क्रीडा स्पर्धा रणसंग्राम सुरू झाले आले. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे, तसेच कुलसचिव डॉ. अरविंद किवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्‍पर्धा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद किवळेकर, अधिष्ठाता डॉ. सचिन पोरे यांच्या हस्ते झाले असून यावेळी विद्यापीठाचे प्रा. डॉ. नेटक, वित्त अधिकारी ओमकार अंबपकर आदी हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा विभागाचे मुख्य समन्वयक डॉ. शिवाजी कराड, रणसंग्रामचे समन्वय प्रा. बालाजी पुलचवाड, समन्वयक गणपत काळसेकर, स्पोर्ट्‌स सेक्रेटरी विश्वजित राठोड आणि क्रीडा विभागातील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी कठोर परिश्रम घेतल्‍याने ‘रणसंग्राम २०२४’ कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम ९ मेपर्यंत सुरू असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com