सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी पथनाट्याचे आयोजन

सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी पथनाट्याचे आयोजन

सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी पथनाट्याचे आयोजन
पाली, ता. ३० (वार्ताहर) : रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ सुधागड तालुक्यात गावागावात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्‍हणजे, हे पथनाट्य लोकांचे लक्ष वेधत आहे.
पाली येथील स्नेहा आंबरे यांच्या कलारंग पथकाच्या माध्यमातून ‘अब की बार, तटकरे फिर से खासदार’ हे जनजागृतीपर पथनाट्य सादर केले जात आहे. हे पथनाट्य लोकांचे लक्ष वेधत आहे. येत्या ७ मे रोजी दुसऱ्या क्रमांकावरील घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन पथनाट्याच्‍या माध्यमातून करण्यात येत आहे. या पथनाट्याला तालुक्यातील नागरिकांचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे पथनाट्य पाली शहरात बसस्थानक, छत्रपती संभाजी महाराज चौक, श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसर, तसेच सुधागड नाडसूर पंचक्रोशीत ठाणाळे व परळी विभागात सादर करण्यात येत आहे.
...................
फोटो ओळ : पालीत पथनाट्य सादर करताना कलाकार, सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्र : अमित गवळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com