मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
आरोग्य सेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविकांवर जबाबदारी
अलिबाग, ता. ३० : वाढत्या तापमानामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. इतर राज्यातील अनुभवानुसार निवडणूक आयोगाने रायगड लोकसभा मतदारसंघात त्‍यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मतदानावेळी ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
मतदारांना उष्माघात तसेच अन्य त्रास झाल्यास त्वरित प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी मतदान केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच मतदान दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी गावागावात मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान मे महिन्यात होणार असल्याने या कालावधीत तापमान अधिक राहणार आहे. यामुळे मतदानासाठी येणाऱ्या काही नागरिकांना उष्म्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे.
मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून जिल्‍हा आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य सेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या आरोग्य पथकाकडे एखाद्या नागरिकाला उष्म्याचा त्रास झाल्यास त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य उपलब्ध असणार आहे. तसेच मतदान दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी दिली.

*******
मे महिन्यात तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात आरोग्य सेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविका असतील.
- डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com