तटकरे यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांचे काव्यमय प्रतिपादन

तटकरे यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांचे काव्यमय प्रतिपादन

तटकरे यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांचे काव्यमय प्रतिपादन
पाली, ता. २ (वार्ताहर) ः ‘नरेंद्र मोदीच आहेत या देशाचे वाली, म्हणून मी आलो आहे तुमच्या पाली. महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगडमध्ये हरणार आहेत अनंत गीते!..’ उद्धवजी ठाकरे करते है बातें बडी बडी, लेकिन चुनकर आने वाली है सुनीलजी की घडी, अशा काव्यमय शेरो-शायरीतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी (ता.१) महायुतीच्या पाली येथील प्रचारसभेत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचार केला.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, जवळपास ४६ कोटी लोकांना या सरकारकडून मुद्रा योजनेतून कर्ज मिळाले आहे. ५० हजारांपासून ते १० लाखांपर्यंत विनाअट, विना तारण कर्ज, तसेच ५० हजारांपासून २० लाखांपर्यंत कर्ज योजना आता तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, दलित, आदिवासी, ओबीसी अशा सगळ्या समूहातील लोकांना त्याचा लाभ घेता येईल. या सर्व समूहातील लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून चार कोटी लोकांना घरे देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लाखांची दवाखान्यातील उपचारासाठी योजना राबविण्यात आली आहे. तसेच राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गसारखे रस्त्याचे जाळे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विणले गेले आहे. महाविकास आघाडी ही समाजात भेद निर्माण करण्याचे काम करते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताला तोडण्याचे काम राहुल गांधी यांच्या माध्यमातून इंडिया आघाडी करत आहे. संविधानाच्या माध्यमातून सर्व देश एकत्र करण्याचे काम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. राष्ट्रवाद हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकविला आहे. राष्ट्रवाद म्हणजे जात, धर्म, पंथ, भाषा यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे महायुतीचा ४०० पारचा नारा पूर्ण करण्यासाठी सुनील तटकरे यांना निवडून देण्याचे यावेळी त्‍यांनी आवाहन केले. तसेच सुनील तटकरे हे एक ते दीड लाखांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वासदेखील आठवले यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com