रायगडमध्ये प्रचाराचा जोर वाढला

रायगडमध्ये प्रचाराचा जोर वाढला

रायगडमध्ये प्रचाराचा जोर वाढला
वाढत्या तापमानातही कार्यकर्ते बेभान; सर्वसामान्य मतदार दूरच
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : प्रचारासाठी जेमतेम चार दिवस शिल्लक राहिलेले असल्याने रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडीसह विविध पक्षांच्या निवडणूक प्रचारामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. देश आणि राज्यपातळीवरील नेते स्टार प्रचारकांच्या भाषणामुळे निवडणूक प्रचाराला चांगलीच धार आली आहे.
प्रचारासाठी काही तास उरले असल्याने उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार नेते आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या प्रचारापासून सर्वसामान्य मतदार दूरच राहिला असल्याचेही दिसून येत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्‍यामुळे सर्व राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी कसब पणाला लावले जात आहे. यामध्ये शेवटच्‍या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. २२ एप्रिल रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे, महाआघाडीचे अनंत गीते यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यासह अन्य ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांच्या दोन्ही बाजूंकडून रायगड लोकसभा मतदारसंघात राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या निवडणूक अर्ज भरताना अलिबागमध्ये भव्य सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर माणगाव तालुक्यातील मोरबा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनंत गीते यांच्या प्रचार सभा पार पडली. पेण येथे राज्‍याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीची नुकतीच सभा झाली. रायगड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण, भारतीय जवान किसान पार्टीचे प्रकाश चव्हाण यांच्यासह प्रमुख पक्षाच्या उमेदवाराकडून निवडणूक प्रचाराच्या फेऱ्या वाढल्याने मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सकाळच्या सत्रात अनेक ठिकाणी सभा होत आहेत. मात्र, दुपारच्या वेळात वातावरणात उष्मा जाणवत असल्याने थोड्या विश्रांतीनंतर कार्यकर्ते सायंकाळी पुन्हा जोमाने कामाला बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. सभा संपल्यानंतर मतदाराच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com