जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न

जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न

Published on

जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी

अलिबाग, ता. २: जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.२८) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ० ते १८ वयोगटातील बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरात बाल अस्थिरोग तज्‍ज्ञ डॉ. मुदीत शहा यांनी १७ बालकांची तपासणी केली व बाल मेंदूविकार तज्‍ज्ञ डॉ. अंकित पांडे यांनी २४ बालकांची पूर्व तपासणी करून पुढील उपचारासाठी संदर्भित केले. शिबिरासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. पंकज पाटील, डॉ. आशिष मिश्रा, आरबीसके समन्वयक सुनील चव्हाण, डीईआयसी व्यवस्थापक गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ता ज्ञानदीप भोईर, सायकॉलॉजिस्ट राजेश पवार, भौतिक उपचार तज्ज्ञ प्रतिष्ठा नाखवा, स्पेशल एज्यूकेटर सीमा विषे, अधिपरिचारिका, ऐश्वर्या थळे आदींनी सहकार्य केले.

अलिबाग ः जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी करताना डॉक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.