उमटे धरणाच्या डागडुजीला  सुरुवात

उमटे धरणाच्या डागडुजीला सुरुवात

Published on

उमटे धरणाच्या डागडुजीला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : उमटे धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. उमटे धरण संघर्ष समितीचे अँड राकेश पाटील यांनी याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्‍यावर प्रशासनाकडून धरण परिसराची पाहणी करण्यात आली होती.
अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी धरणाला पडलेल्या भगदाड पडल्‍याचा अहवाल सादर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमध्ये टीका होऊ लागल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्‍टेवाड तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय वेंगुर्लेकर व अधिकारी उमटे धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्‍यांनतर उमटे धरणाच्या दुरुस्‍तीच्या कामाला सुरुवात झाल्‍याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमटे धरणातील दुरुस्‍तीला सुरुवात झाली आहे. धरणाच्या बांधावर असलेली मोठी झाडी तोडण्यात आल्‍याने धरणाने कित्येक वर्षांनी मोकळा श्वास घेतला आहे.
- ॲड. राकेश पाटील, उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.