Sudhagad: चौघा मच्छीमारांनी लावली जिवाची बाजी अन् पुरात अडकलेल्या दोघी जणींचे वाचवले प्राण, काय घडलं नेमकं ?

Flood Update News: नदीतून दोन महिला वाहून गेल्या असत्या, परंतु मासेमारी करणारे प्रमोद म्हस्कर व त्यांच्या कुटुंबीयांनी धाडस करून महिलांना वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली.
sudhagad flood
sudhagad floodesakal
Published on

पाली, ता. १९ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील दोन महिला रविवारी (ता.१८) सायंकाळी सहाच्या सुमारास अंबा नदीचा प्रवाह वाढल्‍याने अडकल्‍या होत्‍या. याठिकाणी मासेमारी करणाऱ्या चार जणांनी या महिलांना जीवाची बाजी लावून नदीपात्रातून बाहेर काढले.

लता शरद पानसरे व श्वेता शेखर पानसरे या दोन महिला परळी येथील आपली दुकाने बंद करून अंबा नदीच्या पात्रातून करचुंडे येथे घरी निघाल्या होत्या. त्यांच्या सोबत मयुरी महेश वझरेकर व सार्थक शेखर पानसरे हे देखील होते. नदीचे पाणी कमी असल्याने हे चारही जण नदीतून पलीकडे जाण्यासाठी निघाले, मात्र अचानक नदीचे पाण्याचा प्रवाह वाढला. त्‍यामुळे मयुरी वझरेकर व सार्थक पानसरे हे दोघे पाठीमागे फिरून धावत नदीकिनारी पोहोचले. मात्र लता व श्वेता पानसरे या दोघींना पाठीमागे फिरून धावत किनारी जाता न आल्‍याने त्‍या नदीपात्रात अडकल्‍या.

पाण्याच्या जोरदार प्रवाहात त्‍या एकमेकींना धरून उभ्या होत्या. त्‍याच वेळी मासेमारी करत असलेले प्रमोद म्हस्कर, शिवा म्हस्कर, तुकाराम म्हस्क व रवींद्र म्हस्कर यांनी, टायर ट्यूबमध्ये बसून दोर लावून महिलांना जिवाची बाजी लावून सुखरूप नदीकिनारी आणले. नदीकिनारी असलेल्या लोकांनी दोर खेचून मदत केली. या मच्छीमारांचा परळी ग्रामस्थांनी रात्री सत्कार केला.

नदीतून दोन महिला वाहून गेल्या असत्या, परंतु मासेमारी करणारे प्रमोद म्हस्कर व त्यांच्या कुटुंबीयांनी धाडस करून महिलांना वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली. नदीला पाणी अचानक वाढले. धरणातून नदीला सोडण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी सूचना देणे अपेक्षित आहे. त्‍यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. पाणी सोडणार असतील तर खालच्या गावांना सूचना द्यायला हव्या होत्या.

- सुनील साठे, अध्यक्ष, मनसे, सुधागड तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com