आसूडाचे फटके मारत फोडली दहीहंडी

आसूडाचे फटके मारत फोडली दहीहंडी

Published on

सुधागड-जांभूळपाडा येथील अनोखी प्रथा


पाली, ता. २७ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यात पाली, जांभूळपाडा, परळी, पेडली आदी ठिकाणी मंगळवारी दिवसभर दहीहंडीची धूम पाहायला मिळाली. पारंपरिक पद्धतीत तसेच पारंपरिक पेहराव व पारंपरिक वाद्यांच्या चालीवर गोपाळकाला साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जांभूळपाड्यात गोविंदांना आसूडाचे (सोरट) फटके मारत दहीहंडी फोडण्यात आली.
आदिवासी वाड्या-पाड्यावर गोपाळकाल्याचा उत्साह पाहायला मिळाला. नृत्याचा ठेका धरत, गाणी म्हणत बाल गोपाळ घरोघरी जात पाणी, प्रसाद मागत होते. दहीहंडी फोडल्‍यावर तयार केलेला काल्‍याचा प्रसादाचेही नंतर सर्वत्र वाटप करण्यात आले. मुसळधार पाऊस व ढगाळ वातावरणात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना आणखीनच मजा आली.
सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथे आसूडाचे फटके मारत अनोख्या पद्धतीने दहीहंडी साजरी करण्याची प्रथा आहे. गोविंदांच्या अंगात कान्होबाचे वारे येते आणि हे सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा करतात आणि मग गोविंदा आसूडाचे फटके अंगावर मारून घेत गावभर फिरतात. ही परंपरा कधी सुरू झाली हे सांगता येत नसले, तरी आजही ती जपली जात आहे. काही ठिकाणी कृष्णजन्माच्या वेळी रात्री १२ वाजताच दहीहंडी फोडली जाते.

पाली ः जांभूळपाडा येथे गोविंदांनी अंगावर आसूडाचे फटके मारून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com