बोगस बियाण्यांमुळे निकृष्‍ट दर्जाचे भातपीक

बोगस बियाण्यांमुळे निकृष्‍ट दर्जाचे भातपीक
Published on

पाली, ता. ३ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यात आपटवणे येथील शेकडो शेतकरी संकटात आले आहेत. अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीमुळे हवालदिल झाले आहेत. बोगस बियाण्यांमुळे वर्षभराची मेहनत मातीमोल झाल्‍याने तालुक्‍यातील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
आपटवणे येथील शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले होते; मात्र ९० टक्क्यांपेक्षा जास्त बियाणे खेड, काळी कचरी, भेळ असल्यामुळे आलेल्या निकृष्‍ट दर्जाच्या भातपिकाला भाव मिळणार नाही. अतिशय कष्टाने आणि खर्चाने केलेली लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे, त्‍यामुळे कृषी सेवा केंद्राची चौकशी करून योग्‍य कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरवर्षी शेतकरी वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रातून भात बियाणे घेतो. यंदाच्या मोसमात येथील शेतकऱ्यांनी जे बियाणे घेतले, ते बियाणे लागवडीच्या तीन महिन्यांनंतर पीक लोंबीवर आले; मात्र या भातशेतीत ९९ टक्के पिकावर खेड आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले असून, आता ओल्‍या दुष्काळाचे सावट आहे. सरकारने जलद पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
- शरद गोळे, पदाधिकारी, सुधागड कृषिमित्र संघटना

नुकसानभरपाईची मागणी
आम्हा सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर आहे. वर्षभर जे काही तुटपुंजी साठवतो, तीच शेतलागवडीत टाकतो; मात्र बोगस बियाण्यांमुळे मेहनतीबरोबरच खर्चही वाया जाणार असून उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वैशाली केदारी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

पाली ः खराब झालेले भातपीक दाखवताना शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com