एमजीएममध्ये झेब्रा फिशवर संशोधन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : झेब्रा फिश या प्राण्याचे जीन्स मनुष्याशी जुळते असल्याने हे संशोधन मानवाच्या आरोग्याबाबत संशोधनास हातभार लावणारे असेल, असे प्रतिपादन एम.जी.एम. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुधीर कदम व प्रमुख पाहुणे डॉ. नितीन कदम यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चमार्फत प्रायोजित व झेब्रा फिश लॅबोरेटरी कोलॅबरेटीव ग्रुप एम.जी.एम. स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने मासिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कदम यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. नितीन कदम, तसेच डॉ. शशांक दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कामोठे येथील झेब्रा फिश लॅबोरेटरी ही स्वायत्त विद्यापीठाअंतर्गत बायोटेक्नॉलॉजी विभागाची राज्यात पहिली लॅबोरेटरी असून, २०१२ पासून कार्यरत असून, २०१४ मध्ये झेब्रा फिश लॅबोरेटरी कोलॅबरेटीव ग्रुपच्या वतीने मिळालेल्या अनुदानातून श्रेणीवर्धन करण्यात आले. कामोठे येथे झेब्रा फिश लॅबोरेटरीची उभारणी करण्यात डॉ. मानसी ठाकूर व डॉ. हिमांशू गुप्ता यांची महत्त्वाची भूमिका आहे. सध्या लॅबमध्ये दोन हजार झेब्रा फिश उपलब्ध असून, इंटर्नशिप व प्रशिक्षणाचे कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याचे माहिती झेब्रा फिश लॅबोरेटरी इन्चार्ज डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली. हा प्रशिक्षण कार्यक्रम १६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आला. प्रशिक्षणाचा लाभ १९ प्रशिक्षणार्थींनी घेतला असून, त्यात राज्यातील १० तर राज्याबाहेरील ९ प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

