विज्ञान प्रदर्शनात अंजली वाघ हिचे सुयश

विज्ञान प्रदर्शनात अंजली वाघ हिचे सुयश

Published on

विज्ञान प्रदर्शनात अंजली वाघ हिचे सुयश
अलिबाग, ता. १८ : शालेय विज्ञान प्रदर्शनात राज्य स्तरावर भरारी घेणाऱ्या कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा, झुगरेवाडी येथील विद्यार्थिनी अंजली भास्कर वाघ हिचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सत्कार केला. या वेळी डॉ. भरत बास्टेवाड यांनी अंजली हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रायगड जिल्हा परिषद शाळा, झुगरेवाडी येथे आठवीत शिकणारी विद्यार्थिनी अंजली भास्कर वाघ हिने शालेय विज्ञान प्रदर्शनात रस्ते सुरक्षा विषयावर प्रकल्प सदर केला होता. या प्रकल्पाला तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त झाला. यानंतर प्रकल्पाची निवड राज्य स्तरावर करण्यात आली होती. एका दुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केलेल्या प्रकल्पाने राज्य स्तरापर्यंत झेप घेतली. यामुळे डॉ. भरत बास्टेवाड यांनी अंजली वाघ हिचा सत्कार केला. तसेच या वेळी शाळेतील विद्यार्थी वेदांत म्हात्रे याचा सत्कारही करण्यात आला. वेदांत हा ढोलकी व पखवाज वादक आहे. या वेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, झुगरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे, शिक्षक सतीश घावत यांच्यासह भास्कर वाघ उपस्थित होते.
.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com