नाशिक, अहमदनगरची रताळी बाजारात

नाशिक, अहमदनगरची रताळी बाजारात

Published on

अलिबाग, ता. २५ (वार्ताहर) ः उपवासाच्या पदार्थांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे रताळी महाशिवरात्रीनिमित्ताने बाजारात दाखल झाली आहे. रायगडमध्ये सध्या नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून रताळी दाखल झाली आहेत.
चवीला गोड असलेल्या रताळ्यांना उपवासांच्या काळात मागणी असल्‍याचे लक्षात घेउन दोन-तीन महिने आधीच त्‍याची लागवड केली जाते. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून सध्या ट्रकमधून रताळी अलिबागच्या बाजारात दाखल झाली आहेत.
कोनफळ, कणकं, भुईमुगाच्या शेंगा याबरोबरच उन्हाळी फळांची आवक वाढू लागली आहे. टरबूज, खरबूज, संत्री या फळांची आवक वाढली आहे. संत्र्याला १०० रुपये किलो दर मिळत आहे. आणखी पंधरा दिवसांत आवक सुरू राहणार असल्‍याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सफरचंद, पपई व चिक्कूचे भाव सध्या स्थिर आहेत. टरबूज ५० रुपये किलो, तर खरबूज ८० रुपये किलोने दराने मिळत आहे. अॅपल बोरची आवक वाढली असून ३० रुपये किलोने विक्री होत आहे. डाळिंबाला सध्या चांगले भाव मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com