बालविकास विभागात कोट्यवधीचा अपहार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२५ : रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या अलिबाग पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागात कोट्यवधींचा अपहार झाल्याची घटना ताजी आहे. अशातच आता अलिबाग पंचायत समितीमधील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कोट्यवधीचा अपहार झाला असून अलिबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अलिबाग पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कार्यरत असताना कनिष्ठ सहायक नाना कोरडे यांनी वेतन देयकामध्ये वाढीव वेतन देयक म्हणुन ४ कोटी १२ लाख ३४ हजार ७७१ फरकाचे बनावट वेतन देयक बनवले होते. ही रक्कम चाळविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे असलेला खाते क्र.२०३/३०५ येथे जमा करून बालविकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांच्या खोट्या स्वाक्षरीने स्वतःच्या व इत्तर अशासकीय खात्यांवर जमा करण्यात आली होती. या प्रकरणी तत्कालिन कनिष्ठ सहायकासह ज्योतिराम वरुडे आणि महेश मांडवकर यांच्यावर २ कोटी २३ लाख ५० हजारांच्या अपहारप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

