हजारो पेंढ्यांच्या गंजी जळून खाक

हजारो पेंढ्यांच्या गंजी जळून खाक

Published on

हजारो पेढ्यांची गंजी खाक
२० हजारांचे नुकसान; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

पाली, ता. २६ (वार्ताहर) ः शहराजवळच्या झाप गावातील दोन शेतात बुधवारी दुपारी एक-दीडच्या सुमारास वणवा लागला. या वेळी डोळ्यादेखत हजारो पेढ्यांची गंजी जळून खाक झाल्‍याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. आगीमुळे १५ ते २० हजारांचे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
झाप येथील शेतकरी चंद्रगुप्त भालेराव, मंगेश भालेराव व सुधीर भालेराव या शेतकरी बंधूंच्या शेतावर असलेल्या जवळपास दोन हजार पेंढ्यांच्या गंजी खाक झाल्या आहे. पेंढ्यांना आग लागल्‍याचे समजताच, भालेराव बंधू शेतावर पोचले, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. बघता बघता दोन्ही शेतांमध्ये ठेवलेला पेंढा खाक झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे कळू शकलेले नाही. तलाठी, कृषी अधिकारी व वीज वितरण अधिकारी यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी पंचनामा करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. अशी मागणी भालेराव बंधूंनी केली आहे.
जिल्ह्यात वारंवार मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वणवा लागण्याच्या घटना वाढत आहेत. याचा फटका पशुपक्ष्यांना बसत असून शेतीचेही मोठे नुकसान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com