मुलींच्‍या प्रगतीसाठी शेकापचा पुढाकार

मुलींच्‍या प्रगतीसाठी शेकापचा पुढाकार

Published on

मुलींच्‍या प्रगतीसाठी शेकापचा पुढाकार
चित्रलेखा पाटील यांच्याकडून सायकल वाटप कार्यक्रमाला प्रतिसाद
अलिबाग, ता. १०: मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना या राक्षसी वृत्तीमुळे मुलींच्या शिक्षणात बाधा येऊ नये यासाठी ग्रामीण भागातील मुलांनी सायकल वाटपाची मोहिम शेतकरी कामगार पक्षाने सुरु केली आहे. ही मोहीम आता चळवळ होत असून चाक हे प्रगतीचे प्रतिक आहे. त्यामुळे सायकली घेऊन अशाच पुढे जा, असे आवाहन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थींनींना केले. यावेळी त्यांनी मुलींच्या शिक्षणाला उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
अलिबागमधील कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये अलिबाग व मुरूड तालुक्यातील दोनशेहून अधिक मुलींना सायकल देण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवारी (ता.८) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजिस प्रा. लि. या कंपनीच्या सीएसआर प्रमुख राधा आगरवाल आदी मान्यवरांसह महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, अलिबाग व मुरूडमधील विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, संस्था उभारणे, त्या वाढविणे, रुजविणे, आणि मोठे करणे हे शेतकरी कामगार पक्षाचे ध्येय धोरण राहिले आहे. आज वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनेकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. सीएफटीआय ही संस्था मिझोरामसह अन्य राज्यात कार्यरत असली, तरीदेखील या संस्थेचा जन्म अलिबागमध्ये झाल्याचा आनंद आहे. पाणी, शिक्षण आरोग्याबरोबरच ग्रामीण विकास आणि महिलांच्या प्रश्नांबाबत ही संस्था काम करीत आहे. ८० हजारहून अधिक लाभार्थी असून अनेकांना रोजगाराचे दालन खुले आहे. दिल्लीपासून अलिबागपर्यंत या संस्थेतील कर्मचारी तळागाळातील घटकांपर्यंत पोहचून काम करीत आहेत. संस्थेचा जनतेला फायदा झाला पाहिजे ही भूमिकेतून काम केले जात आहे. देशातील ५० नामवंत कंपन्यांपर्यंत ही संस्था काम करीत आहे. या संस्थेचे समाजकार्य खुप चांगले राहिले आहे. ही संस्था सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत असल्याचा आनंद आहे.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com