सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची संपत्ती

सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची संपत्ती
Published on

वेतन हजारांत, मालमत्ता कोटींची
माहिती अधिकारात उघड; सरकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी


सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : रायगड जिल्ह्यातील जनता पाणी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून दुरावत असताना जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मात्र अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. नुकत्याच उघडकीस आलेल्या रायगड जिल्‍हा परिषदेच्या घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांसह महसूल विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी वेतनातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा दहापट जास्त किमतीच्या जागा जिल्ह्यात खरेदी केल्याचे माहिती अधिकारातून उघड होत आहे. या सरकारी सेवकांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी याठिकाणी रुजू झाल्यानंतर उत्पन्नापेक्षा दहापट जास्त मालमत्ता जमा केल्याची प्राथमिक माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांच्या हाती लागली आहे. ही मालमत्ता स्वतःच्या नावाने न घेता नातेवाइकांच्या नावाने घेण्याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतल्‍याचे समोर येत आहे. नुकत्याच उघड झालेल्या जिल्‍हा परिषदेतील वेतन घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई व अलिबाग शहरात कोट्यवधींच्या मालमत्ता विकत घेतल्याची माहितीही सावंत यांना मिळाली आहे.
सरकारी नियमानुसार, गट ‘ड’मधील अधिकारी वगळता अन्य अधिकाऱ्यांनी आपली मालमत्ता व दायित्व विवरण पत्रे सादर करणे गरजेचे आहे. हे सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते. तसेच नियमित पदोन्नतीमधून त्याला वगळण्यात येते. मात्र, तरीही अनेक अधिकाऱ्यांनी विवरण पत्र सादर केले नसल्याचे समोर आले आहे. ज्‍या अधिकाऱ्यांनी विवरण पत्र सादर केली नाहीत, त्याची नावे जिल्हा प्रशासनाने जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

राज्याच्या महसुली उत्पन्नातले तब्बल ३५ टक्के म्हणजे दीड लाख कोटी रुपये नोकरशाहीच्या वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनावर खर्च होतो. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा खर्च तो वेगळाच. तो समाविष्ट केला तर हा आकडा सुमारे दोन लाख कोटींपर्यंत जाईल. विशेष म्‍हणजे विकासकामांवरील खर्चाच्या तिप्पट खर्च सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. नागरिकांकडून कराच्या स्वरूपात जमा होणाऱ्या महसुलातून या कर्मचाऱ्यांना पगारांसह इतर सुविधा दिल्या जातात, मात्र तरीही भ्रष्‍टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. याची चौकशी होणे गरजेचे आहे.
- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com