झिराडमधील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

झिराडमधील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Published on

झिराडमधील विद्यार्थ्यांना सायकलवाटप
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : दिलीप ऊर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शंभरहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना शनिवारी (ता. १२) मोफत सायकली देण्यात आल्या. दिलीप भोईर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. झिराड व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलो मीटरची पायपीट करावी लागत होती; मात्र हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळणार आहे.
परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमामुळे शिक्षणाच्या मार्गाला गती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या वेळी झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच संध्या गावडे, महेश माने, अशोक थळे, रवींद्र म्हात्रे, हरेश भोईर, सुजाता माने आदी मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, साई क्रीडा महिला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल हे गतीचे प्रतीक आहे. हे जाणून ग्रामीण भागातील गरीब तसेच गरजू मुली व मुलांना सामाजिक बांधिलकीतून सायकली देण्याचे काम दिलीप भोईर यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केले. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होण्यास चालना मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com