

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ : झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्महाउसमधील जलतरण तलावात बुडून एका चारवर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सायंकाळी घडली. मांडवा सागरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्महाउसमध्ये सुरेंद्रकुमार अशोक दास (२८, मूळ रामगड, झारखंड) हा केअरटेकर म्हणून पत्नी निकिताकुमारी व चारवर्षीय मुलगी अतिक्षासह (४) बंगल्यात राहत होता. गुरुवारी दुपारी मुलगी वडिलांसोबत खेळत होती. त्याचवेळी बंगल्यात पाण्याचा टँकर आल्याने मुलीला सोडून दास टँकर खाली करण्यासाठी गेले. थोड्या वेळाने परतल्यावर त्यांनी पत्नीकडे मुलीबाबत विचारणा केली. शोधाशोध सुरू केली असता ती जलतरण तलावात तरंगताना दिसली. त्यांनी मुलीला पाण्यातून बाहेर काढले असता ती बेशुद्धावस्थेत होती. दोघा पती-पत्नीने मुलीला चोंढी येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून मुलीला त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी मुलीला तपासले असता ती मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद मांडवा सागरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.