ताम्हिणी घाटात ॲसिडने भरलेला टँकर उलटला

ताम्हिणी घाटात ॲसिडने भरलेला टँकर उलटला
Published on

ताम्हिणी घाटात ॲसिडने भरलेला टँकर उलटला


पाली, ता.२५ (वार्ताहर) : ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ रविवारी (ता. २५) सकाळी हायड्रोक्लोरिक ॲसिडची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला उलटला. घाट परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेचा काही भाग कोसळल्याने टँकरचे नियंत्रण सुटले आणि तो उलटल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात ॲसिडगळती झाली, यामुळे परिसरात एकच धूर पसरला. घटनेची माहिती मिळताच पोलिस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खबरदारी घेत नियोजन करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यामध्ये टॅंकरमधील ॲसिड गळती रोखून आजूबाजूचा परिसर सुरक्षित करण्यात आला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, उलटलेला ॲसिडचा टँकर काढण्यासाठी प्रशासनाकडून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून ताम्हिणी घाट रस्ता दोन तासांसाठी बंद करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com