घातक रसायनामुळे दोन म्हशींसह पारडूचा मृत्यू

घातक रसायनामुळे दोन म्हशींसह पारडूचा मृत्यू
Published on

पाली, ता. ३१ (वार्ताहर)ः रासळमध्ये घातक रसायनाच्या संपर्कात आल्‍याने दोन म्हशींसह एका पारडूचा मृत्यू झाला आहे, तर तब्बल सहा म्हशी व दोन पारडू होरपळून जखमी झाले आहेत.
एस. आय. कंपनी व सनशिल्ड कंपनीतील घातक रसायन ओढ्यात सोडण्यात आले होते. या रसायनमिश्रित पाण्याच्या संपर्कात म्हशी आल्याने ही दुर्घटना घडली आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. २९) दोन्ही कंपनीविरोधात पाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रासळ येथील शेतकरी दीपक खाडे यांनी रविवारी (ता. २५) आपल्या आठ म्हशी व तीन पारडू ओव्हळ परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. त्या गुरांना सायंकाळी खाडे घरी घेऊन येताना, दोन्ही कंपन्यांमधून रसायनयुक्त पाणी ओढ्यात सोडले जात असल्‍याचे आढळले. या ओढ्यातून खाडे यांच्या म्हशी व पारडी आल्याने रसायनयुक्‍त पाण्यामुळे गुरांच्या शरीरावरील कातडी जळून दुखापत झाली. त्यातील दोन म्हशी व एक पारडू मयत झाले तर सहा म्हशी आणि दोन पारडू जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून जनावरांनादेखील मोठी इजा पोहोचली आहे.

कंपन्यांवर कारवाईची मागणी
संबंधित कंपनी प्रशासनाने नुकसानभरपाई देण्याची व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. या प्रकरणाचा तपास पालीतील पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही. एन. जिवडे करीत आहेत.


फोटो ओळ
पाली ः केमिकलच्या पाण्यामुळे कातडी जळलेल्या म्हशी व पारडू. (छायाचित्र ः अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com